मुंबई – भाजप आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. सामनाकार शिवसेना नेत्यांनी सुशांत आणि सुशांतच्या कुटुंबाला बदनाम आणी अपमानित करण्याची सुपारी घेतल्याच दिसत असल्याचा आरोप भाजप नेते राम कदम यांनी केला आहे.७४ वर्षांच्या म्हाताऱ्या सुशांतच्या वडिलांना आणी कुटुंबियांना वारंवार शिवसेना नेत्यांनी अपमानित केलं. आता देवाघरी गेलेल्या सुशांतला देखील मेल्यानंतर सुद्धा शिवसेना नेते बरे वाइट बोलायला मागेपुढे पाहत नाहीत.अत्यंत वाईट शब्दात अपमानित करतात मृत्युनंतर शत्रूला देखील बरं वाईट बोलू नये हां हिंदू धर्मातला संस्कार शिवसेना नेते सामनाकार राजकारणाच्या स्वार्थापोटी विसरले हे दुद्रैव असल्याचं राम कदम म्हणाले आहेत.
सुशांतच्या आत्महत्येला आता तीन महिने झाले आहेत. अजून हा गुंता सुटलेला नाही. AIIMS च्या रिपोर्टनुसार सुशांतची आत्महत्या झालेली आहे. परंतु सीबीआयचा तपास अजून पूर्ण झाला नाही त्याच्या आधीच आत्मसाक्षतकार आशीर्वाद प्राप्त झालेले महाविकास आघाडी य सरकार आणि शिवसेना नेते सुशांतबाबतीत चौकशी पूर्ण होण्या आधिच निष्कर्षापर्यंत येतात याचं आश्चर्य कमी पण त्यांंना कुणाला वाचवायचं आहे? हा प्रश्न अधिक पडत असल्याचं राम कदम यांनी म्हटलं आहे.
COMMENTS