राम मंदिर वर्गणीवरुन शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष

राम मंदिर वर्गणीवरुन शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष

मुंबईः अयोध्येतील राम मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबविणार आहेत. या अभियानावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आक्षेप नोंदवला आहे. संजय राऊतांच्या या भूमिकेवर भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

अयोध्येचा राजा प्रभू श्री राम यांच्या मंदिरासाठी लोकांनी बलिदान दिलंय. व न्यायालयाच्या आदेशानं मंदिर निर्माण होतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झालंय. तरीही अयोध्याच्या राजासाठी वर्गणी गोळा करायला घरोघरी जाणार हा अयोध्येच्या राजाचा आणि हिंदुत्वाचा अपमान आहे,’ अशी टीका संजय राऊत यांनी  केली आहे.

‘चार लाख स्वयंसेवक गावागावात जाऊन वर्गणी गोळा करणार हे लोकांना मान्य नाही. हे चार लाख लोक कोणाच्या प्रचारासाठी पाठवत आहेत?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच, राम मंदिराचा मुद्दा आता राजकारणातून दूर व्हायला हवा. राम मंदिराचं राजकारण केव्हा तरी संपवावं,’ अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, आशिष शेलार यांनी  आंदोलनात ज्यांची केवळ राजकीय घुसखोरी होती त्यांनाच राम मंदिराच्या भूमी पुजनाची पोटदुखी झाली होती आणि त्यांनाच आता रामवर्गणी डोळ्यात खूपतेय. मुंबई पालिका कंत्राटदारांच्या मर्जीने चालवणाऱ्यांना स्वतःच्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे आहे?, असा टोलाही लगावला आहे.

 

 

 

COMMENTS