धनगर आरक्षणाबाबत राम शिंदेंचा भाजपला घरचा आहेर !

धनगर आरक्षणाबाबत राम शिंदेंचा भाजपला घरचा आहेर !

पुणे – धनगर आरक्षणाबाबत जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. राज्यातील धनगर समाजाला आरक्षण मिळण्यास उशीर होत असल्याचं राम शिंदे यांनी म्हटलं आहे. परंतु २०१९च्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस धनगर समाजाला आरक्षण मिळवून देतील असं आश्वासनही राम शिंदे यांनी पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिलं आहे.

दरम्यान मागील निवडणुकीमध्ये राज्यात आणि केंद्रात सत्तेमध्ये येण्यापूर्वी धनगर समाजाला आरक्षण देऊ असं आश्वासन भाजापनं दिले होते. परंतु अजूनपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळाले नसल्यामुळे धनगर बांधवांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. तसेच याबाबत भाजपवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. धनगर आरक्षणाबाबत ‘बार्टी’ या संस्थेला शासनाने संशोधनाचे काम सोपवले होते. त्यांनी धनगर समाजाला आरक्षण देणे शक्य नसल्याचे आपल्या अहवालात म्हटले होते. त्यानंतर ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ या संस्थेकडे आरक्षणाबाबत नवा संशोधन अहवाल तयार करण्याची जबाबदार देण्यात आली आहे. त्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे, हा अहवाल सकारात्मक असेल अशी अपेक्षा राम शिंदे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता तरी भाजप सरकार आरक्षण देणार की निवडणुकीच्या तोंडावर फक्त आश्वासनांची पानं तोंडाला पुसणार असा सवाल आता धनगर समाजाकडून केला जात आहे.

 

 

COMMENTS