अहमदनगर – माझ्याविरोधात पवार कुटुंब होतं. मात्र आजपर्यंत त्यांनी या मतदारसंघासाठी काहीही केलं नाही. त्यांनी फक्त पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला. मात्र त्यांचा प्रयत्न लोक हाणून पाडतील आणि माझा विजय निश्चित करतील, असा विश्वास अहमदनगरचे पालकमंत्री आणि भाजप उमेदवार राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे.धनशक्तीला परतवून लावण्याची ताकद माझ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. घटनेने निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे, तरी गेल्या 50 वर्षात आपण काय योगदान दिलं, याचा विचार करुन विरोधकांनी इथे उमेदवारी भरायला पाहिजे होती, असंही राम शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान कर्जत जामखेडमधील विधानसभा निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि भाजपचे नेते राम शिंदे मैदानात आहेत. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं जोरदार ताकद लावली आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार रोहीत पवार यांचा विजय होईल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. परंतु माझ्याविरोधात पवार कुटुंब होतं. मात्र आजपर्यंत त्यांनी या मतदारसंघासाठी काहीही केलं नाही. त्यांनी फक्त पैशाचा वापर मोठ्याप्रमाणात केला. मात्र त्यांचा प्रयत्न लोक हाणून पाडतील आणि माझा विजय निश्चित करतील, असा विश्वास राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
COMMENTS