अहमदनगर – जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी शेतक-यांना अजब सल्ला दिला आहे. त्यांच्या या सल्ल्यामुळे राज्यातील शेतक-यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन सोडा, असा अजब सल्ला राम शिंदे यांनी दिला आहे. राम शिंदेंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राम शिंदे हे पाथर्डी येथे आले होते. त्यावेळी एक शेतकरी शिंदे यांना भेटायला आला व दुष्काळी स्थितीमुळे चारा उपलब्ध नाही. त्यामुळे जनावरांची चाऱ्या अभावी उपासमार होत असल्याचे शेतकरी मंत्री शिंदे यांना सांगत होता.
यावर त्या शेतकऱ्याचे समाधान करण्याची जबाबदारी शिंदे यांची होती. परंतु, चारा नसेल तर आपली जनावरे पाहुण्याकडे नेऊन बांधा, असा अजब सल्ला त्यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्याचा शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनीही निषेध केला आहे. सरकारची जबाबदारी झटकण्याची ही भाषा असल्याचा आरोप रघुनाथ पाटील यांनी केला आहे.
COMMENTS