मी तरीही मंत्रीपद मिळवले – रामदास आठवले

मी तरीही मंत्रीपद मिळवले – रामदास आठवले

मुंबई – रामदास आठवले यांच्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाने लोकसभा निवडणुकीत कोणतीही जागा लढवली नाही. परंतु तरीही आठवले यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं. याबाबत आठवले यांना पत्रकारांनी विचारले असता मी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाही भेटलो नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटलो नाही. तरीही मंत्रीपद मिळवले आहे, त्यामुळे मंत्रीपद कसे मिळवायचे हे माझ्याकडून शिका असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

दरम्यान आपल्या पक्षाला एक जागा मिळावी म्हणून आठवलेंनी आग्रह धरला होता. मात्र एकही जागा दिली गेली नाही. आठवले यांना मंत्रीपद मात्र मिळालं. याबाबत बोलताना आठवले म्हटले की मंत्रीपद कसं मिळवायचं हे माझ्याकडून शिका असं म्हटलं आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. याबाबत आठवलेंना विचारले असता शरद पवार यांनी आता काँग्रेससोबत राहू नये. त्यांनी आता एनडीएत आलं पाहिजे. शरद पवार यांची पॉवर काँग्रेसपेक्षा जास्त आहे. मी इथे आहे तर शरद पवार तिथे काय करत आहेत? असाही प्रश्न आठवले यांनी विचारला आहे.

COMMENTS