मुंबई – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं भाजप सरकारविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. 2 मे रोजी राज्यभरात मोर्चाचे आयोजन करण्यात आलं असून ऍट्रॉसिटी कायदा आणि दलित आरक्षणाला संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. देशभरात स्त्रियांवर होत असलेले अत्याचारांच्या घटनांची गंभीर दखल घेऊन ते थांबवण्यासाठी कायदा कठोर करावा, लहान मुलींचं सरंक्षण करण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आरपीयनं केली आहे.
दरम्यान कोरेगाव भीमा जातीय दंगलीत संभाजी भिडे यांची भूमिका तपासून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्याची मागणीही आरपीआयनं केली आहे. यासाठी मागण्यांसाठी राज्यभर मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चादरम्यान मुंबईत पश्चिम उपनगरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचं आयोजन केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशाने मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चाचे नेतृत्व आठवले करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS