भीमा कोरेगावातील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट -रामदास आठवले

भीमा कोरेगावातील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट -रामदास आठवले

पुणे – कोरेगाव भीमा हिंसाचार हा पूर्वनियोजित कट असून मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्याविरोधात अनेक तक्रारी आहेत. याबाबत मुख्यमंत्री  परदेशातून परत आल्यावर भेटून जबाबदार असलेल्यांना अटक करण्याची मागणी करणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. तसेच दलित-मराठा वाद अयोग्य असून महाराष्ट्राला तो परवडणारा नसल्याचं आठवले यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

दरम्यान भीमा कोरेगावातली दंगल हे सरकार आणि पोलिसांचं अपयश  असून वढूला जाण्यापासून जमावाला पोलिसांनी रोखायला पाहिजे होतं असही आठवले यांनी म्हटलं आहे. कोरेगाव भीमा हिंसाचारात भिडे एकबोटे यांचा हात असल्याची आपलीही माहिती आहे. त्यासाठी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना अटक करून विश्वास नांगरे पाटील यांनी चांगलं काम करावं असही आठवले यांनी म्हटलं आहे. तसेच जिग्नेश मेवाणी यांच्या भाषणामुळे दंगल पेटली नसून त्यांना मोठा नेता व्हायचा असेल तर भडकाऊ भाषण करणं त्यांनी टाळावं. तसेच संविधान बचाव रॅली काढायची तर काढा पण नरेंद्र मोदी संविधानाचे संरक्षण करण्यास सक्षम आहेत असही रामदास आठवले यांनी त्यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS