कोल्हापूर – पर्यावरण रामदास कदम यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या कंपन्या पाणी प्रक्रिया न करता प्रदूषित पाणी पंचगंगा नदीत सोडतात त्या कंपन्या बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तानी खोटी माहिती दिल्यामुळे ते भडकले असल्याचं पहावयास मिळालं आहे. चुकीची माहिती देवू नका नाहीतर कारवाई करु असा इशाराही रामदास कदम यांनी आयुक्तांना दिला आहे.
दरम्यान या कंपन्या पंचगंगा नदीत प्रक्रिया करुन पाणी सोडत असल्याची माहिती आयक्तांनी दिली होती. परंतु पाठपुराव्यानंतर तसाच मैला पंचगंगा नदीत सोडला जात असल्याची माहिती रामदास कदम यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेत या कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या कंपन्या मैला नदीत सोडत असतील तर कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यावर गुन्हे करण्याचे आदेशही रामदास कदम यांनी दिले आहेत.
COMMENTS