प्लास्टिक बंदीबाबत रामदास कदम यांचा महत्त्वाचा आदेश !

प्लास्टिक बंदीबाबत रामदास कदम यांचा महत्त्वाचा आदेश !

मुंबई – राज्यातील प्लास्टिक बंदीबाबत पर्यावरणमंत्री रामदास कमद यांनी महत्त्वाचा आदेश दिला आहे. प्लास्टिक बंदी कायम असून यापुढे व्यापाऱ्यांना प्लस्टिक वापरास मुदतवाढ दिली जाणार नसल्याचा आदेश रामदास कदम यांनी दिला आहे. तसेच प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करुन राज्यातील प्लास्टिक बंदीची मोहीम काटेकोरपणे राबविण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत.

दरम्यान मंत्रालयात राज्यातील प्लास्टिक बंदी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.  यावेळी पर्यावरण प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, पर्यावरण विभागाचे सर्व आधिकारी उपस्थित होते. प्लास्टिक बंदी मोहीम सुरु असून व्यापाऱ्यांना आणि उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना तीन महिन्यांची मुदत दिली होती. ती संपत असून यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच वैयक्तीक कारवाईची मोहीम सुरु करण्याचा महत्त्वाचा आदेश रामदास कदम यांनी यावेळी दिला आहे.

COMMENTS