अयोध्येत मंदिर आणि मशिदीच्या आधी बौद्ध मंदिर होते – रामदास आठवले

अयोध्येत मंदिर आणि मशिदीच्या आधी बौद्ध मंदिर होते – रामदास आठवले

जयपूर – केंद्रीय समाज कल्याणमंत्री रामदास आठवले यांच्या वक्तव्याने आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अयोध्येतील जागेवर बौद्ध मंदिर पाडून त्या ठिकाणी मंदिर आणि मशीद उभारल्याचं आठवले म्हणाले. आताही ती जागा खोदली तर बौद्ध मंदिराचे अवशेष सापडतील असा दावाही रामदास आठवले यांनी केला आहे. मात्र बौद्ध मंदिर बांधण्याबाबत मात्र ते काहीही बोलले नाहीत. उलट त्या जागेवर मंदिर आणि मशिद व्हायला हवी असंही ते म्हणाले. तिथल्या 60 एकर जागेपैकी 40 एकर जागेत राम मंदिर तर उरलेल्या 20 एकर जागेत मशिद व्हायला हवी असंही आठवले म्हणाले.

क्रिकेट आणि इतर खेळातही  अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमातींना आरक्षण मिळायला हवे असंही आठवले म्हणाले. तसंच लष्करातही आरक्षण मिळायला हवं असंही आठवले म्हणाले. नरेंद्र मोदी यांचे सरकार गोरगरींबासाठी काम करत आहे असा दावा करत आगामी 2019 च्या निवडणुकीत भाजपला 300 जागा मिळतील असं भाकितही आठवले यांनी केलं आहे. राजस्थान पत्रिका या हिंदी वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे.

COMMENTS