राष्ट्रवादीने तिकीट दिले नाही तर उदयनराजेंनी आमच्या पक्षात यावे – रामदास आठवले

राष्ट्रवादीने तिकीट दिले नाही तर उदयनराजेंनी आमच्या पक्षात यावे – रामदास आठवले

ठाणे – केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले काल ठाण्यामध्ये आले होते. पक्षाचे अधिवेशन ठाण्यात होणार आहे. त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांना साता-यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट मिळणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे. हीच संधी साधत आठवले यांनी उदयनराजे यांना ऑफर दिली आहे. त्यांच्या पक्षाने तिकीट दिलं नाही तर त्यांनी आरपीआयमध्ये यावे असं आवाहन त्यांनी केलं आहे.

निवडणुकीत आमची मते मित्रपक्षांना मिळतात परंतु त्यांची मते आम्हाला मिळत नाहीत. त्यामुळे आमचा एकही खासदार किंवा आमदार नाही अशी खंत यावेळी आठवले यांनी व्यक्त केली. 2019 मध्ये आपण दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढवणार आहोत असंही आठवले म्हणाले. भाजप शिवसेना युती झाली तर ती जागा शिवसेनेने आपल्याला द्यावी आणि त्या बदल्यात भाजपने त्यांना इतर ठिकाणची जागा द्यावी या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला. राफेल प्रकरणावरुनही त्यांनी नरेंद्र मोदी यांची जोरदार पाठराखण केली. राहुल गांधी यांना टिका करण्याची सवय आहे. तर मोदी टिका पचवणारे नेते आहेत असंही आठवले म्हणाले.

COMMENTS