बीड – परळीत भाजप नेत्या पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला असून त्यांचे समर्थक आणि चुलत भाऊ असलेले रामेश्वर मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. रामेश्वर मुंडे यांनी धनंज मुंडे यांच्या उपस्थितीत आज राष्टेरवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पंकजा मुंडे यांना जोरदार धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान रामेश्वर मुंडे हे गेली अनेक वर्षांपासून पंकजा मुंडे यांच्यासोबत भाजपमध्ये काम करत होते. काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषद निवडणूक त्यांनी लढवली होती. या निवडणुकीत त्यांचेच चुलत भाऊ आणि धनंजय मुंडे समर्थक असलेले अजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर आता रामेश्वर मुंडे यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.
COMMENTS