मुंबई – साताय्रातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. मी आज राष्ट्रवादीतच आहे, उद्याचं उद्या पाहू असं म्हणत रामराजे निंबाळकर यांनी स्वतःच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांबाबत संभ्रम निर्माण केला आहे.
दरम्यान या वयात शरद पवारांची साथ सोडावी असं वाटत नाही. मी कार्यकर्ता मेळावा बोलावला आहे तो पक्षातून बाहेर पडण्यासाठी नाही तर कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यासाठी बोलवला आहे. कार्यकर्ते कदाचित असाही निर्णय घेऊ शकतात की आपण आहोत तिथेच राहू. कदाचित ते ठरवू शकतात की आपण अपक्ष लढू. स्वार्थासाठी कोणताही निर्णय घेणार नाही.
मात्र कार्यकर्ते ठरवतील त्या दिशेने जाणार असं रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर मी उद्या काय करणार? हे आज सांगणं थोडं ‘प्रीमॅच्युअर’ होईल. राजकारणात कठोर निर्णय घ्यावे लागतात तसा निर्णय घेण्याची वेळ माझ्यावर येऊ नये इतकंच वाटतं” असंही रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे रामराजे शिवसेनेत जाणार की नाही याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
.
COMMENTS