रामराजे भाजपऐवजी शिवसेनेत जाणार, त्यामुळे वेट अँड वॉचची भूमिका!

रामराजे भाजपऐवजी शिवसेनेत जाणार, त्यामुळे वेट अँड वॉचची भूमिका!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेते शिवसेना-भाजपमध्ये जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकरही शिवसेनेत जाणार असल्याची माहिती आहे. रामराजे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. परंतु ते भाजपऐवजी शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उदयनराजेंच्या निर्णयानंतर ते आपली भूमिका जाहीर करणार असून उदयनराजे जर भाजपात गेले तर रामराजे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद सर्वांना माहीत आहे. उदयनराजे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अपणही भाजपात गेलो तर पुन्हा वाद वाढू शकतो. या कारणावरुन रामराजे हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली असल्याचं बोललं जात आहे. तसेच रामराजे हे विधानपरिषदेचे सभापती आहेत. त्याआधी फलटणमधून ते निवडणूक जिंकले आहेत. युतीमध्ये फलटण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यामुळेही रामराजे शिवसेनेत जाऊ शकतात असं बोललं जात आहे.

COMMENTS