नागपूर – राष्ट्रवादी टॅक्स फ्री आहे ते कुठेही जाऊ शकतात. मात्र शिवसेनेची आयडोलॉजी आजही हिंदुत्ववादी आहे का? हे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करावे. असं वक्तव्य भाजप नेते नारायण राणे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही आघाडी मुख्यमंत्रिपदासाठी केली आहे. जर आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते. बाळासाहेब नेहमी म्हणायचे त्यांना मुख्यमंत्रिपदामध्ये रस नाही. माझ्यासाठी हिंदुत्व महत्वाचे आहे. मात्र उद्धव ठाकरेंचा यात वैयक्तिक स्वार्थ असल्याचं राणे म्हणाले आहेत.
राज्यपालांचे भाषण वाचल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण वाचलं. राज्यपालांच्या भाषणावर बोलताना असे भाषण महाराष्ट्राच्या एकाही मुख्यमंत्र्यांनी केलेले नाही, राज्यातील आर्थिक स्थिती चांगली नाही असं ते बोलले, लाज वाटली नाही. आधी सत्तेत कोण होतं? इतर पक्ष बोलले असते तर गोष्ट वेगळी असती, असेही राणे म्हणाले आहेत.
दरम्यान आपलं मंत्रिमंडळ एक महिना होऊनही पूर्ण झालं नाही. प्रश्नोत्तर होत नाहीत. कामकाज होत नाही. राज्याला कर्तबगार मुख्यमंत्री हवा असे मला वाटते. राज्याच्या विकासाचे प्रश्न ज्याला माहिती आहे. ज्याला ज्ञात आहे. ज्याच्या प्रश्न सोडवायची धमक आहे. असा मुख्यमंत्री राज्याला मिळाला तर महाराष्ट्र चालेल असंही राणे म्हणाले आहेत.
COMMENTS