पंढरपूर – माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगरच्या शंकर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी माजी खासदार रणजिसिंह मोहिते पाटील आणि व्हाईस चेअरमनपदी मिलिंद कुलकर्णी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ४० वर्षानंतर पहिल्यांदाच या कारखान्याची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत मोहिते पाटील कुटूंबातीलच पॅनल एकमेकाविरोधात लढले होते. यामध्ये खासदार विजयसिंह मोहिते पाटील गटाने सर्वच्या सर्व म्हणजेच २१ जागा जिंकल्या होत्या.
दरम्यान डॉ धवलसिंह हे माजी सहकार मंत्री कै प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र असुन १९९२ सालापासून हा कारखाना कै प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या ताब्यात होता. खा विजयसिंह मोहिते पाटील यांचे प्रतापसिंह हे धाकटे भाऊ होते मात्र काही वर्षापूर्वी त्यांच्यात मतभेद झाल्याने प्रतापसिंह यानी विजयसिंहाच्या विरोधात बंड करुन गेल्यावेळी माढा लोकसभेची निवडणुक लढविली होती. मोहिते कुटुंबात सुरु असलेला वाद प्रतापसिंह यांच्या मृत्यूनंतर आता तिसऱ्या पिढीनेही सुरु ठेवल्याचे या निवडणुकीतून समोर आले आहे.
COMMENTS