औरंगाबाद – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना धक्का बसला असून लोकसभा मतदारसंघातील 51 गावांनी दानवेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाणी प्रश्नावरुन पैठण तालुक्यातील 11 गावांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकला आहे, तर इतर 40 गावांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. वर्षानुवर्षे पाण्याचा प्रश्न तसाच प्रलंबित राहिल्याने स्थानिक ग्रामस्थांनी अखेर लोकसभा निवडणुकीच्या काळात आक्रमक भूमिका घेतली आहे.
दरम्यान रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदार संघातून चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. तरीही अनेक गावांमध्ये पाणीप्रश्न गंभीर आहे. त्यामुळे ब्रम्हगव्हान उपसा सिंचन योजना आणि खेरडा प्रकल्प पूर्ण करावी, ही संबंधित गावकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र, निधीअभावी हे प्रकल्प तसेच धुळखात पडून आहेत. त्यामुळे किमान निवडणुकीच्या तोंडावर तरी आपला पाणी प्रश्न मार्गी लागावा या हेतून ग्रामस्थांनी ही भूमिका घेतली असल्याचं दिसत आहे.
COMMENTS