दानवेंच्या घरात साप सोडण्याचा इशारा, 10 पोलीस तैनात !

दानवेंच्या घरात साप सोडण्याचा इशारा, 10 पोलीस तैनात !

जालना – भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील घरात साप सोडण्याचा इशार देण्यात आला आहे. शहरातील बसपच्या कार्यकर्त्यांनी हा इशारा दिला असून त्यामुळे दानवेंच्या घराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. जालना शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोन सुरु आहे. या आंदोलनास येथील बसपच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. त्यानंतर, दानवे यांच्या घरात साप सोडण्याची भाषा बसपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. त्यामुळे दानवेंच्या घराबाहेर 10 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान पंढरपूरच्या वारीत आषाढी एकादशीदिनी काही समाजकंटकांकडून साप सोडण्यात येणार असल्याची माहिती असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे मराठा आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यामुळे आता दानवेंच्याच घरात सापड साडणार असल्याचं या आंदोलकांनी म्हटलं आहे. तसेच मराठा नेते असलेल्या रावसाहेब दानवेंनी गेल्या 20 वर्षात मराठा समाजासाठी काय योगदान दिलं, असा सवाल बहुजन समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

 

COMMENTS