“फडणवीस सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही, भाजपच्या राज्य कार्यकारिणीत सरकारच्या अभिनंदनाचा ठराव !”

“फडणवीस सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही, भाजपच्या राज्य कार्यकारिणीत सरकारच्या अभिनंदनाचा ठराव !”

मुंबई – मुंबईतील वांद्रे येथे आज भाजप प्रदेश कार्यकारणीच्या कार्यक्रमाचा समारोप झाला. दोन दिवस या कार्यकारिणीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी राज्यभरातील भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यकारिणीच्या कार्यक्रमाकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. विशेष म्हणजे या कार्यक्रमादरम्यान भाजपनं दोन ठराव मांडले आहेत. फडणवीस सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसून भाजपच्या राज्य कार्यकारिणीत सरकारच्या अभिनंदनाचा ठराव आज मांडण्यात आला आहे. याबाबतची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

राजकीय ठराव

31 ऑक्टोबरला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला 4 वर्षे पूर्ण होत आहेत.त्यांचा अभिनंदनचा ठराव मांडण्यात आला आहे. एकही भ्रष्टाचारचा आरोप सरकारवर झालेला नाही. विरोधक आता लोकांना confuse करत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

 शेतीविषयक ठराव

दरम्यान केंद्राने आणि राज्याने काही चांगले निर्णय घेतले असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे. सरकारनं हमीभावाबद्दल मोठा निर्णय घेतला असून त्याबद्दल सरकारचे अभिनंदन केले जाणार असून याबाबतचा ठरावही आजच्या समारोपाच्या कार्यक्रमादरम्यान मांडण्यात आला आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी बुथ पातळी पर्यंत जाण्याबाबत संपूर्ण प्लॅनिंग या बैठकीत करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुका कशा लढवल्या जातील, कोणते कार्यक्रम असतील. त्यात कार्यक्रमांची ठिकाणं त्याचबरोबर लोकसभा निवडणुकांसाठी सगळ्यांना एकत्र आणणं अशी सर्व आखणी यावेळी या बैठकीत करण्यात आली आहे.या बैठकीला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते..

COMMENTS