उस्मानाबाद – भाजपाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे़ युती होईल न होईल याची वाट न पाहता उस्मानाबाद लोकसभा जिंकण्याच्या दृष्टीने भाजपा पदाधिकारी, विस्तारक, बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागावे, अशा सूचना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा़सदार रावसाहेब दानवे यांनी केली़.
उस्मानाबाद येथे लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या कामाचा खा़सदार दानवे यांनी आढावा घेतला़. त्यानंतर त्यांनी मार्गदर्शन केले़. यावेळी पक्षाचे राज्य संघटन मंत्री विजय पुराणिक, प्रदेश सरचिटणीस आ़. सुजितसिंह ठाकूर, मराठवाडा संघटन मंत्री भाऊराव देशमुख, लोकसभा निवडणूक प्रभारी मनोज पांगारकर,भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,माजी आमदार राजाभाऊ राऊत, प्रदेश सदस्य अविनाश कोळी, नितीन काळे, अनिल काळे, व्यंकट गुंड, सुरेश पाटील, सुधीर पाटील, देवानंद रोचकरी, विजय दंडनाईक, प्रभाकर मुळे, संताजी चालुक्य, सतीश देशमुख आदींची उपस्थिती होते.
दानवे यांनी प्रारंभी लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा, १२ तालुके व बूथनिहाय कामांचा आढावा जाणून घेतला़पक्षाच्या तालुका, शहर अध्यक्षांकडून कार्यकारिणी, आघाड्या, सेल, नियुक्तीचा आढावा घेतला़ बुथप्रमुख, पन्नाप्रमुख शंभर टक्के नियुक्तीची प्रक्रीया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या़.
यावेळी मार्गदर्शन करताना खा़. दानवे म्हणाले, राज्यातील लोकसभेच्या ४८ व विधानसभेच्या २८८ मतदारसंघातील पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेत आहे़ युती, आघाडी वगैरेचा निर्णय पक्ष घेईल़ परंतू भाजपा कोणत्याही स्थितीला ताकदीने सामोरे जाण्याची तयारी करीत आहे़.
त्या दृष्टीने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातही पक्षाचे काम मजबूत होणे गरजेचे आहे़ हा मतदारसंघ जिंकण्याच्या दृष्टीने पक्षाच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विस्तारक, बूथ प्रमुख, शक्तीप्रमुख व कार्यकर्त्यांनी ताकदीने तयारीला लागावे़ पक्षाच्या बांधणीत कोणतीही कसूर ठेवू नये अशी तंबीही त्यांनी दिली़. तत्पूर्वी प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष श्री़ कुलकर्णी, सुत्रसंचालन मुळे तर आभार, चालुक्य यांनी व्यक्त केले़. आढावा बैठकीत उस्मानाबाद, लातूर व सोलापूर जिल्ह्यातील निमंत्रीत पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते़.
COMMENTS