‘तो’ इशारा शिवसेनेला नव्हे, तर भाजपच्या विरोधकांना, रावसाहेब दानवेंनी घेतला ‘यू टर्न’ !

‘तो’ इशारा शिवसेनेला नव्हे, तर भाजपच्या विरोधकांना, रावसाहेब दानवेंनी घेतला ‘यू टर्न’ !

मुंबई – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेविरोधात केलेल्या वक्तव्यावरुन यू टर्न घेतला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पटक देंगे असा इशारा दिला होता. परंतु हा इशारा शिवसेनेला नव्हे तर भाजपाच्या विरोधात उतरणाऱ्या विरोधकांना होता, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावे अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे शिवसेनेबाबत भाजपनं पुन्हा एकदा नरमाईची भूमिका घेतली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान युतीचा फॉर्म्युला बाळासाहेब ठाकरे असताना ठरला आहे. युतीची चर्चा राज्य पातळीवर व्हावी. जिथे जागांचा प्रश्न निर्माण होतो, त्या ठिकाणी केंद्र पातळीवर चर्चा व्हावी तसेच समविचारी पक्षांची युती झाली पाहिजे असा आमचा आग्रह असून निवडणुकांच्या जागेसंदर्भांत अद्याप शिवसेनेशी चर्चा झाली नाही, पण युतीबाबत आशावादी आहोत असंही दानवे यांनी यावेळी म्हटलं आहे.

भाजपाला हरवण्यासाठी काँग्रेसने राजकारण सुरू केलं असून काँग्रेसने कितीही आघाड्या केल्या तरी त्याचा काहीही राजकीय फायदा त्यांना होणार नाही. भाजपा संघटनेच्या बळावर निवडणूक जिंकेल. विविध योजना आणून आजवर भाजपाने फक्त विकास करून क्रांतिकारक बदल केला असल्याचंही दावने यांनी म्हटलं आहे.

COMMENTS