जालना – जालन्यात सध्या भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली असल्याचं पहावयास मिळत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नगरसेविका संध्या देठे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तेव्हापासून जालन्यातील राजकीय वातावरण तापत असून काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना थेट आव्हान केलं आहे. नगरसेविका संध्या देठे यांना भाजपच्या तिकिटावर निवडून आणा राजकारनातून संन्यास घेईन, आणि भाजपच्या तिकीटाकर निवडून आणले नाही तर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह त्यांच्या बंधूंनी राजकारण सोडावे, असं खुलं आव्हान गोरंट्याल यांनी केलं आहे.
मागील काही दिवसांपूर्व काँग्रेसच्या नगरसेविका संध्या देठे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर माजी मंत्री भगवंतराव गाडे यांचे नातू प्रशांत गाडे यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपची वाट धरली असून आणखी विविध पक्षाचे तीन नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे नगरसेवकांना कामाचे आणि निधीचे अमिष दाखवून फोडाफोडी करीत आहेत, असा आरोप काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे आव्हान स्वीकारून संध्या देठे यांना भाजपच्या तिकीटावर निवडून आणणार का? हे पाहावं लागणार आहे.
COMMENTS