रावसाहेब दानवे भाषणादरम्यान गडबडले, निधनाबाबत वनगांऐवजी घेतलं दुस-याच नेत्याचं नाव !

रावसाहेब दानवे भाषणादरम्यान गडबडले, निधनाबाबत वनगांऐवजी घेतलं दुस-याच नेत्याचं नाव !

पालघर  भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे भाषणादरम्यान पुन्हा एकदा गडबडले असल्याचं दिसून आलं आहे. भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचं निधन झालं असल्याचं बोलण्याऐवजी त्यांनी विष्णू सावरा यांचं निधन झाल्याचं ते बोलले. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत तलासरी इथे सभा घेण्यात आली. या सभेसाठी दानवेंसोबत आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, आमदार मनिषा चौधरी ,आमदार पास्कल धनारे उपस्थित होते. यादरम्यान बोलत असताना त्यांनी वनगांऐवजी विष्णू सावरांचं नाव घेतलं. त्यामुळे मोठा घोळ झाला असल्याचं पहावयास मिळालं आहे. विशेष म्हणजे यावेळी विष्णू सावराही त्याठिकाणी उपस्थित होते.

दरम्यान दानवे यांच्या चुकीनंतर उपस्थितांनी त्यांच्या चुकीची जाणीव करुन दिली. तरीही भाषणाच्या शेवटी सावरांचे कुटुंबीय तिकडे गेले तरी फरक पडणार नाही असंही यावेळी दानवेंनी म्हणाले. त्यामुळे आजच्या भाषणादरम्यान पुन्हा एकदा दानवे गडबडले असल्याचं पहावयास मिळालं आहे.

COMMENTS