खेळ उंदरांचा….
तुमचा सत्तेचा मधुचंद्र
अन आमच्या माथी उंद्रं
झोपी गेला नरेंद्र
अन डूलक्या देतोय देवेंद्र….
सत्तेचा ‘मंत्र’ अन भ्रष्टाचाराची ‘लय’
सैराट सत्तांधांना कुठलं कशाचं भय
मुकी-मुकी ‘मातोश्री’ अन चुप-चाप ‘काकाश्री’
सत्तेच्या कुरणात झालाय भ्रष्टाचार फ्री…
व्यवस्था कुरतडणं या उंदरांचं नेहमीचंच काम
‘शांत’ बसण्यासाठी येथे बोक्यांनाही मिळतो ‘दाम’
उंदीर आणि घुशींची सत्ता आहे जोरात
गरीब बिचारा बापुडा सदैव आपल्याच घोरात..
उंदीर, घुशी अन बोक्यांनो!, दिवस तुमचे सरतील
तुमचे दलाल तुम्हाला कुठवर तारतील
हे जगविधात्या!,…..
खेळ उंदीर-मांजरांचा संपू दे वेगाने
तिरंगा फडकू दे गगनी पून्हा नव्या जोमाने…..
@उमेश अलोणे,
अकोला.
खाली कवीतेच्या फेसबूक पोस्टची लिंक दिली आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1623720941057319&id=100002582867175
COMMENTS