देवरुख नगरपंचायतीत शिवसेनेला धक्का, भाजपचं कमळ फुललं !

देवरुख नगरपंचायतीत शिवसेनेला धक्का, भाजपचं कमळ फुललं !

रत्नागिरी – देवरुख नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेला धक्का बसला असून याठिकाणी भाजपचे कमळ फुललं आहे. भाजपच्या म्हणाल शेट्ये या नगराध्यक्षपदावर विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजच्या मृणाल शेट्ये यांना 2 हजार 435, शिवसेनेच्या धनश्री बोरुकर यांना 2 हजार 316 तर राष्ट्रवादीच्या स्मिता लाड यांना एक हजार 981 मतं मिळाली असून अपक्ष मिताली तळेकर २६४  आणि अपक्ष उमेदवार अनघा कांगणे यांना ३७७ मतं मिळाली आहेत.

दरम्यान देवरूख नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेनं जोरदार कंबर कसली होती. ही निवडणूक स्वबळावर लढवत शिवसेनेनं ‘डिजिटल रथ’ आणून हायटेक प्रचारात एक पाऊल पुढे टाकले होते. आपला प्रचार दमदार आणि आधुनिक पद्धतीने व्हावा यासाठी शिवसेनेने ही डिजिटल सुरुवात केली होती. परंतु शिवसेनेच्या डिजिटल प्रचाराला धुडकावत तेथील मतदारांनी भाजपचं कमळ फुलवलं आहे. भाजपच्या या विजयामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे.

COMMENTS