काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी रद्द, ‘यांना’ देणार उमेदवारी?

काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी रद्द, ‘यांना’ देणार उमेदवारी?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून आता रमेश कीर यांचे नाव आघाडीवर असून नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्यावर सनातन संस्थेशी संबंध असल्याच्या आरोपानंतर त्यांची उमेदवारी रद्द करण्याच्या काँग्रेसमध्ये हालचाली सुरु केल्या आहेत. विविध स्तरातून बांदिवडेकरांना विरोध होत असल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.

दरम्यान रमेश कीर यांनी रत्नागिरी काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. तसेच कोकण म्हाडाचे अध्यक्ष म्हणून देखील कार्यभारही त्यांनी सांभाळला आहे. कीर हे भंडारी समाजातील नेते असल्यामुळे या मतदारसंघात त्यांना जनतेचा पाठिंबा आहे. त्यामुळेच त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

COMMENTS