मुंबई – राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नावाच्या शिफारशीवर महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेसमध्ये दोन मंत्र्यांमध्ये कुरबुरी झाली. मुंबई प्रदेश काॅंग्रेस भवनामध्ये प्रभारी एच के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राज्यातील दलित नेत्यांची बैठक झाली. यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महसूलमंत्री व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या भूमिकेबाबत नाव न घेता आक्षेप घेतला.
काॅंग्रेसमध्ये प्रभारी एच के पाटील हे मुंबईत दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहे. त्यांनी राज्यातील दलित मतदार काँग्रेसपासून दूर गेला यासाठी राज्यातील दलित नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला सुशीलकुमार शिंदे, एकनाथ गायकवाड, नितीन राऊत, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात होते.
राज्यमंत्री मंडळाने नुकतेच राज्यपाल नियुक्त बारा नावांची शिफारस करण्यात आली. त्यात काँग्रेसकडून अनिरुद्ध वनकर यांचे नाव देण्यात आले. अनिरुद्ध वनकर यांनी वंचितकडून निवडणूक लढवली होती. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला राज्यात फटका बसला आहे. अशी उमेदवारी दिली गेली. याबाबत पक्षात मत जाणून घेण्यात आले नाही. काँग्रेस विरोधात निवडणूक लढवलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली, असा आक्षेप ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता घेतला.
COMMENTS