मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर अनेक आरोप केले आहेत. अन्वय नाईक यांची जागा ठाकरे कुटुंबाने घेतली असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात ३० व्यवहार झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला. त्यांच्या आरोपाला आमदार रवींद्र वायकर यांनी सडेतोड उत्तर दिल आहे. असे व्यवहार झाले असतील तर सोमय्यांनी सिद्ध करावे असे आव्हान शिवसेना नेते रविंद्र वायकर यांनी दिलंय.
तसेच सोमय्यांना कायदेशीर मार्गाने उत्तर देणार असून अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे वायकर यावेळी म्हणाले. साडे नऊ एकर जागा जी आहे ती अन्वय नाईक यांच्याकडून घेतली गेली आहे आणि हा व्यवहार 2014 रोजी झालेला आहे. किरीट सोमय्या वेडा झालेला आहे. त्याची खासदारकी गेली त्या कारणास्तव नैरश्यातून आता तो या गोष्टी बोलत आहे. हिम्मत असेल तर बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर असं आव्हान रवींद्र वायकर यांनी सोमय्या यांना दिलं आहे.
एखाद्या मराठी माणसाने मराठी माणसाची जागा विकत घेतली तर तो काही गुन्हा आहे का? का फक्त परप्रांतीयांनी जागा विकत घ्यायच्या असा सवाल रवींद्र वायकर यांनी केला आहे. 2014 साली जागा विकत घेताना जी काही कायदेशीर प्रक्रिया करायची होती त्या सर्व प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत. ठाकरे कुटुंब व माझे एक शिवसैनिक म्हणून पूर्ण परिवारासोबत संबंध आहेत. 1974 पासून मी या कुटुंबाशी जोडला गेलेलो आहे. असंही वायकर यांनी म्हटलं आहे.
COMMENTS