नेम चुकला आणि बाण धनुष्यात घुसला

नेम चुकला आणि बाण धनुष्यात घुसला

मुंबई : भाजपावर शरसंधान केल्याचा आव आणत रवींद्र वायकर यांनी PMC बँक घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. घोटाळ्यात राजकीय नेते असल्याचा त्यांचा कयास अगदी योग्य होता, फक्त त्यांचा नेम चुकला आणि बाण धनुष्यात घुसला, अशी टिका भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करीत शिवसेनेवर केली.

पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी मंत्री रवींद्र वायकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून यामध्ये अनेक राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याने त्याची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने ईडी मार्फत चौकशी सुरू केली.

या घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना चौकशीसाठी ईडीने नोटीस पाठविल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. तसेच शुक्रवारी संजय राऊत यांचे निकटवर्षी प्रवीण राऊत यांची ७५ कोटींची मालमत्ता जप्त केली. यावरून अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

COMMENTS