राफेल करारावरु देशात मोठं वादंग सुरू आहे. केंद्र सरकार यावरुन बॅकफूटवर गेलं आहे. रोज नवनवे खुलासे आणि दावे प्रतिदावे होत आहेत. देशाच्या राजकारणात सरकारच्या विरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी यावरुन सरकाराला घेरलं आहे. यामध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. अनिल अंबानी यांच्या फायद्यासाठी रिलायन्सला हे कंत्राट दिल्याचा आरोप होत आहे. माध्यमांमध्येही दररोज याविषयी बातम्या येत आहे. एनडीडीव्हीला मात्र राफेल कराराच्या बातम्या देणं महागात पडलं आहे. रिलायन्स या कंपनीनं या प्रकरणी अहमदाबाद कोर्टात दावा दाखल केला आहे. राफेल करारासंदर्भात एनडीटिव्हीच्या ट्रूथ विरुद्ध हाइप या कार्यक्रमामुळे मानहानी झाल्याचा दावा करत 10 हजार कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी रिलायन्सनं केली आहे.
सर्व माध्यमांनी याविषयीच्या बातम्या दिल्या आहेत, मात्र एनडीटीव्हीलाच नोटीस का असा सवाल एनडीडीव्हीच्या सीईओ सुर्पणा सिंह यांनी केला आहे. केवळ आमच्यावर दबाव टाकण्यासाठी आणि सत्य दडपण्यासाठी रिलायन्सनं हा प्रकार केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसं ट्विट त्यांनी केलं आहे.
NDTV has been sued by Anil Ambani’s Reliance for 10,000 crores in an AHMEDABAD court. For our coverage of Rafale. We will fight this brazen attempt at harassment and intimidation.
— Suparna Singh (@Suparna_Singh) October 18, 2018
COMMENTS