राष्ट्रवादीचा आक्षेप फोल, शिवसेनेला मोठा दिलासा !

राष्ट्रवादीचा आक्षेप फोल, शिवसेनेला मोठा दिलासा !

नाशिक  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आक्षेप अखेर फोल ठरला असून शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे. विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अर्ज 12 तासांच्या छाननीनंतर वैध ठरवण्यात आला आहे. दराडे यांचा अर्जावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला होता. या छाननीमध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेला चांगलाच घाम फोडला होता. याबाबत शिवाजी सहाणे यांनी हरकत घेतली होती.

दरम्यान राष्ट्रवादीकडून दराडे यांच्या पत्नीच्या नावाने येवला नगरपालिकेची दीड लाख रुपयांची थकबाकी आहे. अर्ज भरताना अपूर्ण अर्ज भरला आहे. तसेच दराडे यांच्यावर अवलंबून असणाऱ्या वारसाची माहिती असणारा रकाना जोडला नसल्याचा आक्षेप घेतला होता. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात एकच धावपळ उडाली असल्याचं पहावयास मिळालं. यासाठी राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह आमदार आणि वरिष्ठ पदाधिकारी शुक्रवारी सकाळी अकरा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणीसाठी हजर होते. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिका-यांनी आयोगाकडून मार्गदर्शन मागवून सर्वोच्च न्यायालयाच्या केसेसचा अभ्यास करुन त्यानंतर दराडेंच्या बाजून निकाल दिला. त्यामुळे दराडे यांना दिलासा मिळाला आहे.

COMMENTS