27 महापालिकेतील महापौर आरक्षण जाहीर !

27 महापालिकेतील महापौर आरक्षण जाहीर !

मुंबई – 27 महापालिकांमधील पुढील अडीच वर्षांसाठी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर करण्यात आली आहे. मुंबई, पुणे नागपूर, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सुमारे 27 महापालिकांमधील आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. महापालिकांच्या महापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्वीच संपुष्टात आला होता. परंतु विधानसभा निवडणुकीमुळे महापौरपदाच्या कालावधीची मुदतवाढ दिली होती. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर, त्वरित ही सोडत जाहीर होणार होती. परंतु, सध्या राज्यात सत्तास्थापनेचा घोळ सुरू असल्यामुळे दुपारी 3 वाजता प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली आहे.

महापौर सोडत

अनुसूचित जाती ( महिला ) –
अहमदनगर, परभणी

अनुसूचित जाती – मीरा भाईंदर
महापौर सोडत

वसई विरार – अनुसुचित जमाती
महापौर सोडत

मागास प्रवर्ग ( महिला ) – नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, मालेगाव

मागास प्रवर्ग – लातूर, धुळे, अमरावती

महापौर सोडत, खुला प्रवर्ग, महिला आरक्षित

नवी मुंबई, जळगाव, भिवंडी, अकोला, पनवेल, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, चंद्रपूर
महापौर

खुला प्रवर्ग, सर्वसाधारण

मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, कडोंमपा, सांगली, उल्हासनगर

COMMENTS