शेतकरी आंदोलनात या अभिनेत्याने घेतली उडी

शेतकरी आंदोलनात या अभिनेत्याने घेतली उडी

मुंबई – केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात गेल्या पाच दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातले लोक पुढे आले. त्यानंतर मराठीतील दिग्गज साहित्यिकांनीही पाठींबा दर्शवला आहे. दरम्यान, शनिवारी प्रसिध्द अभिनेता रितेश देशमुख यानेही ट्विट करून आपण शेतकऱ्यांसोबत असल्याचे स्पष्ट केले.

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी  कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला असून सगळे शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने दिल्लीत एकवटले आहेत. सुरुवातीला या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला. कडाक्याच्या थंडीत सुद्धा त्यांच्यावर पाण्याचे फवारे, अश्रुधूरांच्या नळकांड्या आणि लाठी हल्ला या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या.  त्यामुळे या आंदोलनाची धग देशभरात पोहचली आहे.

या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटना, शेतमजूर व कामगार संघटनांच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालायवर मोर्चा काढण्यात आले. आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी काॅंग्रेसच्यावतीनेही राज्यव्यापी आंदोलन करण्यात करण्यात येणार आहे. तीन दिवसांपूर्वी मराठीतील साहित्यांनी आपला पाठिंबा दर्शवला होता. त्यात आता अभिनेता रितेश देशमुख यानेही पाठिंबा दर्शवला आहे.

त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपले जे खातो ते शेतकऱ्यांमुळे , मी देशातील सर्व शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, जय किसान,

 

COMMENTS