महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांना राष्ट्रवादीने दाखवले काळे झेंडे

महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांना राष्ट्रवादीने दाखवले काळे झेंडे

उस्मानाबाद  – राष्ट्रवादी काँग्रेच्या कार्यकर्त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी केली.  शेतकरी अडचणीत असल्याने त्यांना मदत करण्याऐवजी सरकार त्रास देत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीने मंत्र्यांना जिल्हा बंदी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादीने मागण्या पूर्ण करण्याची मुदत 20 नोव्हेंबर होती. ती संपल्याने आमदार रणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आज सकाळी लातुरकडून येणाऱ्या सर्व रस्त्यांवर राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि पदाधिकारी हातात काळे झेंडे घेऊन उभे होते.  महसूलमंत्री पाटील यांना तीन वेळा मार्ग बदलावा लागला. चंद्रकांत पाटील सुरुवातीला मुरुड नंतर औसा, पाडोळीमार्गे येणार असे सांगितले. प्रत्यक्षात सकाळी 7 च्या सुमारास ते तुळजापूर मार्गे आले. बेंबळी पाटी व पाटोदा पाटी येथे कार्यकर्त्यानी काळे झेंडे दाखविले.

COMMENTS