जर मला मंत्रिमंडळात संधी दिली तर… – रोहित पवार

जर मला मंत्रिमंडळात संधी दिली तर… – रोहित पवार

अहमदनगर – महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार येत्या 30 तारखेला होणार आहे. त्यामुळे या विस्ताराकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. तसेच या विस्तारात मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे तरुण आमदार रोहित पवार यांनीही वक्तव्य केलं आहे.
जर मला मंत्रिमंडळात संधी दिली तर मी त्याचं सोनं करेन. तसेच इतरही आमदार महत्त्वाचे असून अपेक्षा न ठेवता मी काम करतोय, संधी द्यायची की नाही हे पार्टी ठरवेल. मात्र या जिल्ह्यावर अन्याय होऊन देणार नसल्याचं त्यांना म्हटलं आहे.

दरम्यान बोलणारे बोलत असतात मात्र मी सामाजिक आणि व्यावसायिक कामं करतो. तेव्हा लोकांची इच्छा असते काम करणाऱ्यांना संधी दिली पाहिजे. मात्र अशी जबाबदारी आल्यास ती स्वीकारावी लागेल. परंतु पदाची अपेक्षा न ठेवता मी काम करत आहे.तसेच पार्टी व्यक्तिगत चालत नसते त्यात अनेक घटकांचा विचार केला जातो. त्यात अनेक समीकरणे असतात त्यात मला किती वाटलं मला संधी द्यावी आणि जर संधी दिली तर मी त्याचं सोनं करेल. मात्र इतरही आमदार महत्वाचे असल्याचं रोहित पवार म्हणालेत.

COMMENTS