पुणे – राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर विधानसभा निवडणुकीसाठी तीन पर्याय ठेवले आहेत.पुरंदर, कर्जत-जामखेड किंवा हडपसर यापैकी एका मतदारसंघातून आपण लढणार असून, कोणत्या मतदारसंघातून मी लढायंच, हे पक्षश्रेष्ठींनी ठरवावं, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आघाडीत यावं. काँग्रेसनेने देखील मनसेला सोबत घेण्याचा विचार करावा, असेही मत रोहित पवार यांनी मांडले.
दरम्यान रोहित पवार यांनी घराणेशाहीबाबतही उत्तर दिलं आहे. “पवारांच्या घरात घराणेशाही कसली? पणजोबांपासून घरात राजकारण आहे, तर मी काय अजून वेगळं करणार आहे? असं ते म्हणाले आहेत.तसेच महाराष्ट्रात एक्झिट पोलच्या वेगळं चित्र निवडणुकीच्या निकालादिवशी असेल. यंदा महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला 23 पेक्षा जास्त जागा मिळतील”, असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
COMMENTS