मुंबई – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एका नेटकय्राचे कान टोचले आहेत. “देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडं जबाबदार पद आहे आणि आरोग्याच्या बाबतीत कुणी खोटं बोलत नसतं. त्यामुळं त्यांच्याबाबत असं बोलणं योग्य नाही, त्यांचा आपण सन्मान ठेवलाच पाहिजे. दुसरा मुद्दा मात्र खरा आहे. बिहारमध्ये भाजप हरणार असं अनेकजण बोलतायेत आणि अनेकजण ते कबूलही करतायेत,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. याबाबतचं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.
दरम्यान एका नेटकऱ्यानं फडणवीस बिहारच्या निकालामुळे नाटक करत असल्याचं ट्विट केलं होतं. त्यावरून आमदार रोहित पवारांनी त्याचे कान टोचले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या करोनाचा संसर्ग झाल्यानं उपचार घेत आहेत. परंतु या नेटकय्रानं ट्वीट करत कोरोना वगैरे काही नाही, बिहारमध्ये बीजेपी १००% हरणार आहे, हे त्यांना स्पष्ट दिसतंय आणि त्याचं खापर आपल्यावर फुटू नये म्हणून हे कोरोनाचं नाटक… बाकी काही नाही दादा, असं म्हटलं आहे.
त्यावर रोहित पवार यांनी ट्वीट केलं असून
“देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडं जबाबदार पद आहे आणि आरोग्याच्या बाबतीत कुणी खोटं बोलत नसतं. त्यामुळं त्यांच्याबाबत असं बोलणं योग्य नाही, त्यांचा आपण सन्मान ठेवलाच पाहिजे. दुसरा मुद्दा मात्र खरा आहे. बिहारमध्ये भाजप हरणार असं अनेकजण बोलतायेत आणि अनेकजण ते कबूलही करतायेत,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र जी फडणवीस यांच्याकडं जबाबदार पद आहे आणि आरोग्याच्या बाबतीत कुणी खोटं बोलत नसतं, त्यामुळं त्यांच्याबाबत असं बोलणं योग्य नाही, त्यांचा आपण सन्मान ठेवलाच पाहिजे.
दुसरा मुद्दा मात्र खरा आहे. बिहारमध्ये भाजप हरणार असं अनेकजण बोलतायेत आणि अनेकजण ते कबूलही करतायेत. https://t.co/K04fKRjkIk— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 25, 2020
COMMENTS