भाऊ रोहितनं दिला पार्थ पवारांना ‘हा’ सल्ला !

भाऊ रोहितनं दिला पार्थ पवारांना ‘हा’ सल्ला !

पुणे – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. त्यामुळे मावळमधून पार्थ पवार हे लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. याबाबत पार्थ पवार यांचे चुलत भाऊन रोहित पवार यांनी त्यांना सल्लाही दिला आहे. पार्थ पवारने आता लोकांशी संवाद साधायला हवा, लोकांमध्ये जावे, त्यांचे काम करावे, असा सल्ला भाऊ रोहितने पार्थला दिला आहे.

लोकांशी संवाद ठेवणं महत्त्वाचं असून छोट्यात छोटा कार्यकर्ता महत्त्वाचा असतो. शेवटी तोच आपला विचार, साहेबांचा विचार हा लोकांपर्यंत पोहोचवत असतो. लोकांच्या अडीअडचणी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे छोटा कार्यकर्ता आणि लोकांशी संवाद ठेवणं महत्त्वाचं आहे. या संवादाच्या माध्यमामातून ज्या अडचणी असतील, त्या पुढे जाऊन निवडून आल्यानंतर, सत्तेत आल्यानंतर सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा, अशी इच्छा मी व्यक्त करतो, असं रोहित पवार यांनी पार्थ पवार यांना म्हटलं आहे.

COMMENTS