मुंबई – आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला आहे. पवारांच्या या निर्णयावर त्यांचे नाती रोह्त पवार यांनी पुनर्विचार करावा असं आवाहन केलं आहे. रोहित पवार यांनी एका भावनिक फेसबुक पोस्टद्वारे शरद पवारांना निर्णयाचा पुनर्विचार करावा, असं म्हटलं आहे.
रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट
“राजकारणातले मोठमोठ्ठे लोक साहेबांच्या राजकारणाचा गौरव करत असताना काय म्हणतात हे आपणाला माहितच आहे पण सर्वसामान्य लोकं काय म्हणतात याकडे पवार साहेब नेहमीच लक्ष देतात. म्हणूनच गेली 52 वर्ष फक्त राजकारणच नाही तर समाजकारणात देखील हिच एकमेव व्यक्ती आमच्यासाठी उभा राहू शकते अस सर्वसामान्य माणसांच मत आहे.
महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या सहवासातून सुरू झालेला साहेबांचा हा प्रवास भेदभावाचं, जातीधर्माचं राजकारण न करता, गेली 52 वर्ष न थकता सर्वसामान्यांसाठी सुरु आहे, म्हणूनच पवार साहेबांच राजकारण कोणत्या हवेवर नाही तर सर्वसामान्यांच्या घरातून चालू होतं. हे मला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या दिवशीच अभिमानाने सांगू वाटतं.
एक कार्यकर्ता म्हणून,
“साहेबांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर हा असणारच आहे, पण या आदरच्या पुढे प्रेम असतं. आणि माझं आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाच हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करा.”
बाकी राहता राहिला हवेतून पदावर बसलेल्या लोकांचा विषय तर साहेबांबद्दलचं आपलं वक्तव्य हे शेवटच असू द्या, तसंही बेडकासारखं हवा भरुन बैल होण्याच्या नादात आपण फुटणार होताच. पण अशी वक्तव्य करत राहिलात तर हवा भरण्याच्या आतच फुटाल.”
असं भावनिक आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे. त्यामुळे निवडणू लढवण्याबाबत शरद पवार हे पुनर्विचार करतील का हे पाहणं गरजेचं आहे.
https://m.facebook.com/RohitPawarOfficial/photos/a.226136124516804/615863678877378/?type=3&refsrc=http%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmumbai-news%2Fsir-reconsider-your-decision-rohit-pawars-emotional-appeal-to-sharad-pawar-1856100%2Flite%2F
COMMENTS