मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपला धक्का बसला असून रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना- भाजपसोबत असलेली रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाची (ए) युती तुटल्याची घोषणा आरपीआयचे जिल्हाध्यक्ष के. डी. कदम व जिल्हा पक्ष प्रवक्ते अनंत पवार यांनी केली आहे. २०१४ पासून युतीत असून देखील भाजप व शिवसेनेने रिपब्लिकन पक्षाला जिल्ह्यात योग्य तो सन्मान दिला नाही त्यामुळे युतीतून आम्ही बाहेर पडत असल्याचं जिल्हाध्यक्ष के. डी. कदम यांनी म्हटलं आहे.
केवळ मतांसाठी आपल्या बरोबर हे पक्ष निवडणूकीपुरती युतीची भाषा करतात. अशांजवळ पुन्हा युती न करता जरी राष्ट्रीय स्थरावर आपली युती असली तरी रत्नागिरी जिल्ह्यात या दोन्ही पक्षाबरोबर आरपीआयची युती राहणार नाही. आज पासुनच या दोन्ही पक्षाबरोबरची युती आम्ही तोडत असल्याचे दापोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आरपीआयचे कोकण कार्याध्यक्ष सिद्धार्थ कासारे, राज्य कार्यकारणी सदस्य दादा मर्चंडे, जिल्हा सरचिटणीस प्रितम रुके आदी उपस्थित होते.
COMMENTS