आरएसएसमध्ये सहभागी होणं देशातील प्रत्येक नागरिकाला बंधनकारक करा – भाजप मंत्री

आरएसएसमध्ये सहभागी होणं देशातील प्रत्येक नागरिकाला बंधनकारक करा – भाजप मंत्री

राष्ट्रीय संस्वंसेवक संघ ही देशातील राष्ट्रीयत्व जपणारी संघटना आहे. या संघटनेत सहभागी होणारे नागरिक शुद्ध चारित्र्याचे बनतात. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला संघात सहभागी होणं बंधनकारक केलं पाहिजे अशी मागणी हरियाणातील भाजपचे मंत्री अनिल वीज यांनी केली आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर वीज बोलत होते. प्रणव मुखर्जी यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयातील कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा निर्णय अत्यंत योग्य असल्याचंही अनिल वीज म्हणाले.

भाजपचे मंत्री अनिल वीज हे अशीच वादग्रस्त वक्तव्य करण्याबाबत नेहमीच चर्चेत असतात. कालच त्यांनी राहुल गांधी यांच्याबाबत बेताल विधान केलं होतं. राहुल गांधी आणि सध्या चर्चेत असलेला निपा विषाणू हे सारखेच आहेत. जे कोणते राजकीय पक्ष राहुल गांधींच्या संपर्कात येतात त्यांचा नायनाट होतो असंही वीज यांनी म्हटलं होतं. त्यावर काँग्रेसकडूनही काहीही प्रतिक्रिया आली नाही. आता आरएसएसमध्ये सहभागी होणं बंधनकारक करण्याबाबतच्या विधानावर काय प्रतिक्रिया येतात ते पहावं लागेल.

COMMENTS