“…तर इंडिया शायनींगचं जे झालं तेच अच्छे दिनंचं होईल ?”

“…तर इंडिया शायनींगचं जे झालं तेच अच्छे दिनंचं होईल ?”

दिल्ली – अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली 2004 मध्ये पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने कंबर कसली होती. त्यावेळी फिल गुड आणि इंडिया शायनींग असे नारे भाजपने दिले होते. मात्र त्या फटका भाजपला बसला होता. मध्यमवर्गीय, दलित, शेतकरी यांची नाराजी भाजपला भोवली होती. आणि काँग्रासच्या नेतृत्वाखाली युपीएचं सरकार सत्तेवर आलं होतं. 2004 मध्ये शायनिंग इंडियाच्या घोषणेनंतर भाजपची जी स्थिती झाली होती. तशीच स्थिती अच्छे दिनच्या घोषणेची 2019 मध्ये होऊ शकते असा इशारा संघाने भाजपला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेसकडून विरोधी पक्षांची महाआघाडीची तयारी सुरू असल्यामुळे त्याचा प्रतिकार कसा करायचा यावर भाजप आणि संघामध्ये विचारमंथन सुरू आहे. संघाकडून प्रत्येक गावपातळीवर काय रणनिती आखावी यावर विचारमंथन सुरू आहे. सुरजकुंडमध्ये सुरू असलेल्या संघाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सहभागी झाले. त्यामध्ये 2019 च्या विरोधकांच्या संभाव्य महाआघाडीचा मुकाबला करण्यासंदर्भात चर्चा झाली. याचवेळी संघाने दलित, शेतकरी यांची नाराजी दूर करण्याचा सल्ला भाजपला दिल्याचं कळतंय.

या वर्षात राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तिसगड या तीन राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्या ठिकाणी भाजप विरोधी वातावरण असल्याचा फिडबॅक भाजपला मिळाला असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भाजप अधिकच दक्ष झाला आहे. या तीनही राज्यात संघाचं नेटवर्क चांगलं आहे. नाराजीचा फटका बसू नये यामुळे काय उपाययोजना करता येतील याबाबत संघ आणि भाजप यांच्यामध्ये चर्चा झाली. तीन राज्यांच्या निकालांचा परिणाम 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीनही राज्यात पराभवाची चव चाखायला लागू असा भाजपाचा प्रयत्न असल्याचं कळतंय.

भाजप सरकारच्या कामगिरीवर संघ नाराज नसला तरी देशभारत सुरू असलेल्या दलितांवर हल्ल्यांमुळे दलितांमध्ये नाराजी पसरली आहे. तसच शेतीप्रश्नावरुनही शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे भाजप सरकारची प्रतिमा दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. त्याचा फटका आगामी निवडणूक बसू शकतो असा इशाराच संघानं भाजपला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

COMMENTS