संघाचा भाजपला इशारा,  …नाहीतर खड्ड्यात जाल !

संघाचा भाजपला इशारा, …नाहीतर खड्ड्यात जाल !

दिल्ली -राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपला इशारा दिला आहे. सत्तेत आल्यापासून भाजपनं अनेक निर्णय घेतले. यामधील काही निर्णयामुळे जनतेचा फायदा झाला तर काही निर्णयामुळे जनतेला अतोनात कळा सोसाव्या लागल्या आहेत. जीएसटी, नोटाबंदीमुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. शेतकरी, व्यापारीवर्ग नाराज आहे. त्यामुळे आर्थिक निर्णय घेताना सर्व सामान्यांचा विचार करुन घ्या. नोटाबंदी, जीएसटी आणि कृषी क्षेत्रातील निराशाजनक कामगिरीमुळे जनतेमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. त्यातच गुजरातमध्ये जनतेचा मिळालेला कौल याकडे गंभीरपणे घ्या. नाहीतर खड्ड्यात जाण्याची वेळ येईल असा इशारा संघानं भाजपला दिला असल्याचं समजतंय. काही महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत भाजपच्या नेतृत्वाला आर्थिक निर्णयाबाबत सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. ‘शेतकरी, उद्योग व सामान्यांची होरपळ करतील असे धाडसी आर्थिक निर्णय घेताना आता शंभरदा विचार करा,’ अशा प्रकारचा स्पष्ट सल्ला संघाकडून भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाला शहा-जेटलींच्या मार्फत पोचविण्यात आल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीला आता जेमतेम दीड वर्ष उरले आहे. त्यामुळे दिलेल्या आश्‍वासनांच्या पूर्ततेबाबत किमान ‘त्या दिशेने काम सुरू आहे’ एवढा तरी संदेश सामान्यांपर्यंत जाण्याची गरज असल्याचं संघाचं म्हणणं आहे.

 

COMMENTS