मुंबई – उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक अत्याचार प्रकरणातील 19 वर्षीय पीडितेचा मंगळवारी सकाळी दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. या प्रकरणावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे.राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि शिवसेनेच्या नेत्या निलम गोह्रे यांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेबाबत मोदी सरकारवर रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. मोदीजी आपल्याला रामराज आणायचंय की गुंडाराज आणायचंय असा सवाल चाकणकर यांनी केला आहे. तसेच शिवसेना नेत्या निलम गोह्रे यांनी देखील मोदी सरकारवर टीका केली आहे.
COMMENTS