मुंबई – मुलींना चांगले संस्कार देण्याची गरज असल्याचं संतापजनक वक्तव्य भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी केलं आहे. ‘चांगले संस्कारच बलात्कार रोखू शकतात’, ‘आपल्या तरुण मुलींवर चांगले संस्कार घडवणे त्यांना शालीन राहण्यास शिकवणे हे आई वडिलांचे कर्तव्य आहे, असे धक्कादायक विधान आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले आहे. सुरेंद्र सिंह हे उत्तर प्रदेशमधील बलिया विधानसभा मतदसंघातील आमदार आहेत. ‘मी आमदार तर आहेच, पण एक शिक्षकही आहे. अशा घटना या संस्कारामुळे थांबू शकतील, त्या काही सरकार किंवा तलवारीमुळे थांबणार नाही. आपल्या तरुण मुलींना संस्कारीत वातावरणात राहण्याच्या, चालण्याच्या आणि एक शालीन व्यवहार दर्शवण्याच्या पद्धती शिकवणं हा आई-वडिलांचा धर्म आहे. अशा घटना केवळ चांगल्या संस्कारांनीच थांबवल्या जाऊ शकतात असं सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.
सुरेंद्र सिंह यांच्या वक्तव्याचा निषेध राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला आहे. पाहा काय म्हणाल्यात रुपाली चाकणकर …
COMMENTS