मुंबई – मंत्रालयातील सारथीच्या बैठकीत मराठा समाज समन्वयकांनी गोंधळ घातला आहे.
छत्रपती संभाजीराजे यांना व्यासपीठाखाली बसवल्यामुळे मराठा समाज समन्वयकांनी गोंधळ घातला. जाणून बुजून छत्रपतींचा अपमान केल्याचा आरोप मराठा समाज समन्वयकांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरु होती. या बैठकीत गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.
जाणून बुजून छत्रपतींचा अपमान केल्याचा आरोप मराठा समाज समन्वयकांनी केला आहे. छत्रपतींबरोबर गेला होतात, खाली बसवायला गेला होतात का? बाहेर काय तोंड द्यायचं आम्ही? बाहेर आम्हाला लोक काय बोलणार? बाहेर एक माणूस तोंड काढू देणार नसल्याची प्रतिक्रिया मराठा समाज समन्वयकांनी दिली आहे.
दरम्यान यावर संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी समाजासाठी आलोय. मला खाली बसण्यात कसलाही अपमान वाटत नाही.गोंधळ घालू नका. आपल्याला समाज महत्वाचा आहे. समाजासाठी आपण मान अपमान न मानता बैठक करू. निर्णय महत्वाचा आहे. सारथी महत्वाची आहे.असे आवाहन त्यांनी मराठा समाज समन्वयकांना केले. त्यानंतर अजित पवारांनी चूक सुधारत राजेंना वरती येण्याचा आग्रह केला.
COMMENTS