मुंबई – विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सचिन अहिर यांच्या खांद्यावर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. सचिन अहिर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचं ट्वीट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं असून माझे सहकारी सचिन अहिरजी तुमची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! आता फक्त वरळीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी तुम्ही अधिक जोमाने काम करतील असा मला विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
माझे सहकारी @AhirsachinAhir जी तुमची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! आता फक्त वरळीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी तुम्ही अधिक जोमाने काम करतील असा मला विश्वास आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 29, 2020
दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या ट्वीटटला अहिर यांनी प्रत्युत्तर दिलं असून पाठिंबा आणि विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद’ असं म्हणत सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरेंचे आभार व्यक्त केले आहेत.
I am very thankful to our Shivsena chief CM @uddhavthackeray Ji for believing in my work & appointing me as Shivsena's Deputy leader. I will work to the best of my abilities for the people of Maharashtra & my party. I also thank @AUThackeray Ji for his support & faith in me. pic.twitter.com/Oq64erShnN
— Sachin Ahir (@AhirsachinAhir) February 29, 2020
दरम्यान विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर 25 जुलै 2019 रोजी सचिन अहिरांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी शरद पवार माझ्या ह्रदयात आहेत, तर उद्धव आणि आदित्य माझ्या शरीरात राहतील. आपण राष्ट्रवादी फोडण्याचं काम करणार नाही, पण शिवसेना वाढवण्याचं काम नक्की करु असं म्हटलं होतं. त्यानंतर आता सचिन अहिर यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे.
COMMENTS