मुंबई – मुंबईच्या आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या जागेचा व्यावसायिक वापर होणार होता. त्या ठिकाणची जागा ही मेट्रो डेपोसोबतच व्यवसायासाठी वापरण्याचे आदेश देण्यात आले होते” असा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह तत्कालीन भाजप सरकारने मुंबईकरांना याबाबत उत्तर द्यावे अशी मागणीही सचिन सावंत यांनी केली.
कांजूरमार्गची जागा ही राज्य सरकारची असताना जाणीवपूर्वक केंद्राची दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपने आरेमध्ये मेट्रोची कारशेड उभारण्याचा घाट घातला होता. सुरुवातीला कमी जागेची परवानगी दिली होती. मात्र फडणवीस सरकारने 61 हेक्टर जागा कारशेडसाठी वापरली. विशेष म्हणजे केवळ कारशेडसाठीच नाही तर त्यासोबतच व्यावसायिक जागेसाठी ती जागा सरकारला वापरायची होती असा आरोप सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.
COMMENTS