मुंबई – मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता चार आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवरील सुप्रीम कोर्टातील सुनावणीसाठी सरकारी वकीलच उपस्थित राहिले नाहीत. यामुळे ही सुनावणी काही काळासाठी तहकूब करावी लागली.त्यामुळे सरकारला चार आठवड्यांची मुदत मिळाली आहे. या काळात पाच न्यायमूर्तीच्या घटनापीठाची स्थापना होऊन ते प्रकरण सुनावणीसाठी त्यासमोर लिस्टिंग व्हावं, यासाठी सरकार अर्ज केला जाणार असल्याची शक्यता आहे.
https://t.co/quEJWANDEc
दरम्यान याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणावरील आजच्या सुनावणीचा विरोधकांककडून अपप्रचार केला जात असून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने स्वतःहून मराठा आरक्षणाचा अंतरिम आदेश रद्द व्हावा हा मोठ्या पीठाचा प्रश्न आहे. असे ई-मेलद्वारे मान्य केले असताना पुन्हा त्याच तीन न्यायमूर्तींकडे सदर अर्ज हा फेरविचार याचिका नसताना रजिस्ट्रीकडून का वर्ग करण्यात आला याचे आश्चर्य वाटते असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
COMMENTS